ला लिहील्या गेले.
Research Matters
Asia Chang on Unsplash

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि राष्ट्रीय सौरऊर्जा संस्थान, नवी दिल्ली ह्या संस्थांमधील वैज्ञानिकांनी भारतात प्रथमच ५१ ठिकाणी सर्वेक्षण करून फोटोव्होल्टॅक मॉड्यूलची कामगिरी कश्या रितीने खालावते याचे सर्वेक्षण केले. सौरऊर्जा यंत्रणांची विश्वसनीयता तपासून बघणे हा ह्या सर्वेक्षणाचा उद्देश होता. भारताला २०२२ पर्यन्त १०० गिगावॉट सौरऊर्जा निर्मितेचे महत्त्वाकांक्षी ध्येय पूर्ण करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल. अभ्यासात असे निदर्शनास आले की अतिउष्ण ठिकाणी असलेल्या, छतावरील आणि लहान आकाराच्या यंत्रणांमधील फोटोव्होल्टॅक मॉड्यूल लवकर खराब होतात.

भारतात सौरऊर्जा क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. ह्या गुंतवणुकीवर परताव्याचे मूल्यांकन करायचे झाल्यास त्यातून दीर्घकाळात किती ऊर्जा निर्मिती होते याचे परिक्षण करणे आवश्यक ठरते, आणि म्हणून फोटोव्होल्टॅक मॉड्यूलच्या दीर्घकालीन कामगिरीचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. अतिउष्ण हवामानामुळे सोल्डर केलेले जोड पिवळे पडून खराब होऊ शकतात, आणि मॉड्यूल नीट न हाताळल्यामुळे सोलार सेलमध्ये सूक्ष्म भेगा पडू शकतात. यामुळे मॉड्यूलची कार्यक्षमता कमी होऊन कमी ऊर्जा निर्माण होते.

आयआयटी मुंबईचे सर्वक्षणकर्ते, प्राध्यापक जुझर वासी म्हणतात, "स्थापना करतानाची क्षमता किती आहे ह्यापेक्षा फोटोव्होल्टॅक मॉड्यूलच्या अपेक्षित २५ वर्षाच्या आयुष्यात त्यातून किती ऊर्जा (गिगावॉट-तास किंवा किलोवॉट-तास) निर्माण होते हे महत्त्वाचे असते. अपेक्षेपेक्षा लवकर त्यांची कामगिरी खालावली तर ते नियोजित ऊर्जेपेक्षा कमी ऊर्जा निर्माण करतील."

प्राध्यापक वासी, त्यांचे सहकारी, प्राध्यापक अनिल कोट्टनथरईल आणि अन्य सहकाऱ्यांनी अनेक चाचण्या केल्या; जसे करंट-व्होल्टेज कॅरक्टरायझेशन, इन्फ्रारेड थर्मोग्राफी इ., त्यांनी जोड (इंटरकनेक्ट) कुठे मोडले आहेत का? निरोधकाचा (इंसुलेटर) रोध कमी झाला आहे का ? वगैरेही तपासले. देशभरातील ५१ ठिकाणी असलेल्या ११४८ सौरऊर्जा यंत्रणा त्यांनी तपासल्या आणि ह्या यंत्रणांची कामगिरी दीर्घकाळात किती खालावेल ह्याचा अंदाज लावला. निवडलेल्या ठिकाणांच्या हवामानाच्या आधारावर त्यांचे या सहा प्रकारात वर्गीकरण केले: अतिउष्ण आणि कोरडे, उष्ण आणि दमट, मिश्र, समशीतोष्ण, थंड आणि भरपूर सूर्यप्रकाश व थंड आणि ढगाळ.

ज्या ठिकाणी वर्षातून बहुतांश दिवस खूप सूर्यप्रकाश असतो ती ठिकाणे सौरऊर्जा यंत्रणा स्थापित करण्यासाठी आदर्श असतात. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश राज्यात असे हवामान असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा यंत्रणा स्थापित केल्या आहेत. पण अतिउष्ण आणि कोरड्या ठिकाणी सोल्डर केलेले जोड मोठ्या प्रमाणात खराब होतात आणि जोडासाठी वापरलेला धातू पिवळा पडतो असे निदर्शनास आले.

सौरऊर्जा यंत्रणा बांधण्यासाठी सूर्यप्रकाश भरपूर असलेल्या पण अतिउष्ण आणि कोरड्या ठिकाणांशिवायपर्याय का नाही हे समजावून सांगताना प्राध्यापक वासी म्हणाले, "आदर्श परिस्थितीत सौरऊर्जा यंत्रणा स्थापित करण्यासाठी खूप सूर्यप्रकाश असलेली थंड ठिकाणे सर्वोत्तम असतात. भारतात अशी हवा फक्त लद्दाखमध्ये आहे. पण दुर्गम अश्या लद्दाखमधून दळणवळण व विजेच्या ग्रिडशी जोडणी कठीण आहे".

अजून एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे मोठ्या  वीज प्रकल्पांच्या तुलनेत छतावरील यंत्रणांची कामगिरी लवकर खालावते. नियोजित १०० गिगावॉट ऊर्जाक्षमतेपैकी ४०  गिगावॉट ऊर्जा छतावरील यंत्रणांमधून येतील असे अपेक्षित आहे म्हणून वरील निरीक्षण महत्त्वाचे ठरते. प्राध्यापक कोट्टनथरईल म्हणतात, "मोठ्या वीज प्रकल्पांच्या तुलनेत छतावरील यंत्रणांची कामगिरी लवकर खालावत असल्यामुळे छतावरील यंत्रणांचे ४० गिगावॉट वीज निर्मीतीचे ध्येय कमी करून जमिनीवरील मोठ्या प्रकल्पांचे ६० गिगावॉट वीज निर्मितीचे ध्येय वाढवणे योग्य ठरेल."

भारतातील सौरऊर्जा यंत्रणा अतिउष्ण आणि कोरड्या ठिकाणी स्थापन होणार असल्यामुळे मॉड्यूलचा मूळ दर्जा चांगला असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर स्थापित करताना सर्वोत्तम पद्धती वापरणे आणि हाताळणी नीट असणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. उच्च दर्जाचे, कुठलेही तडे नसलेले किंवा कमी तडे असलेले फोटोव्होल्टॅक सेल प्रशिक्षित कामगारांकरवी बसवणे खर्चिक वाटू शकते पण तसे केल्याने दीर्घावधीत कामगिरी खालावण्याचे प्रमाण कमीतकमी असेल.

भारताने ह्या क्षेत्रात खूप गुंतवणूक केली आहे. येत्या काही वर्षात ती अनेक पटीने वाढण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारचे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. प्राध्यापक कोट्टनथरईल ह्यांच्या मते ह्या सर्वेक्षणाच्या आधारावर अनेक शिफारसी करता येतील (आणि केल्या आहेत), आणि जर त्या शिफारसी सरकार आणि वीज प्रकल्प मालकांनी मान्य केल्या तर दीर्घावधीत अधिक ऊर्जा निर्मिती करता येईल.  अधिक व्याप्ती आणि विविधता असलेली सर्वेक्षणे २०१८ आणि २०२०  साली करण्याचे ह्या वैज्ञानिकांनी योजले केले आहे. ह्या सर्वेक्षणातून मिळालेल्या व्यापक आणि विश्वसनीय माहितीमुळे राष्ट्रीय सौरऊर्जा मिशनची ध्येये साध्य करण्यात नक्कीच हातभार लागेल.

Recent Stories

लेखक
Research Matters
Representative image of rust: By peter731 from Pixabay

दोन भिन्न विद्युतरासायनिक तंत्रांचा एकत्रित उपयोग करून संशोधकांनी औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या धातूवरील कोटिंग्जचा ऱ्हास किती वेगाने होतो याचे प्रभावीपणे मूल्यांकन केले.

लेखक
Research Matters
प्रतिकात्मक चित्र: सौजन्य पिक्साहाईव्ह

आपत्ती ससज्जता आणि आर्थिक संरक्षणाची दिशा देण्यासाठी राज्याच्या अर्थ नियोजनावर आपत्तीच्या परिणामाचे मूल्यांकन करायला संशोधकांनी डिसास्टर इंटेन्सिटी इंडेक्स (आपत्ती तीव्रता निर्देशांक) वापरला.

लेखक
Research Matters
Lockeia gigantus trace fossils found from Fort Member. Credit: Authors

ಜೈ ನಾರಾಯಣ್ ವ್ಯಾಸ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಸಂಶೋಧಕರು ಜೈಸಲ್ಮೇರ್ ನಗರದ ಬಳಿಯ ಜೈಸಲ್ಮೇರ್ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಲಾಕಿಯಾ ಜೈಗ್ಯಾಂಟಸ್ ಪಳೆಯುಳಿಕೆಗಳನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಇದು ಭಾರತದಿಂದ ಇಂತಹ ಪಳೆಯುಳಿಕೆಗಳ ಮೊದಲ ದಾಖಲೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಇದುವರೆಗೆ ಪತ್ತೆಯಾದ ಅತಿದೊಡ್ಡ ಲಾಕಿಯಾ ಕುರುಹುಗಳು.

लेखक
Research Matters
ಇಂಡೋ-ಬರ್ಮೀಸ್ ಪ್ಯಾಂಗೊಲಿನ್ (ಮನಿಸ್ ಇಂಡೋಬರ್ಮಾನಿಕಾ). ಕೃಪೆ: ವಾಂಗ್ಮೋ, ಎಲ್.ಕೆ., ಘೋಷ್, ಎ., ಡೋಲ್ಕರ್, ಎಸ್. ಮತ್ತು ಇತರರು.

ಕಳ್ಳತನದಿಂದ ಸಾಗಾಟವಾಗುತ್ತಿದ್ದ ಹಲವು ಪ್ರಾಣಿಗಳ ನಡುವೆ ಪ್ಯಾಂಗೋಲಿನ್ ನ ಹೊಸ ಪ್ರಭೇದವನ್ನು ಪತ್ತೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ.

लेखक
Research Matters
ಸ್ಪರ್ಶರಹಿತ ಬೆರಳಚ್ಚು ಸಂವೇದಕದ ಪ್ರಾತಿನಿಧಿಕ ಚಿತ್ರ

ಸಾಧಾರಣವಾಗಿ, ಫೋನ್ ಅನ್ನು ಅನ್ಲಾಕ್ ಮಾಡುವಾಗ ಅಥವಾ ಕಛೇರಿಯಲ್ಲಿ ಬಯೋಮೆಟ್ರಿಕ್ ಸ್ಕ್ಯಾನರುಗಳನ್ನು ಬಳಸುವಾಗ, ನಿಮ್ಮ ಬೆರಳನ್ನು ಸ್ಕ್ಯಾನರಿನ ಮೇಲ್ಮೈಗೆ ಒತ್ತ ಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಬೆರಳಚ್ಚುಗಳನ್ನು ಸೆರೆಹಿಡಿಯುವುದು ಹೀಗೆ. ಆದರೆ, ಹೊಸ ಸಂಶೋಧನೆಯೊಂದು ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಸ್ವಚ್ಛ, ಸುಲಭ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚು ನಿಖರವಾಗಿಸುವ ವಿಧಾನವನ್ನು ರೂಪಿಸಿದೆ. ಸಾಧನವನ್ನು ಮುಟ್ಟದೆಯೇ ಬೆರಳಚ್ಚನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸುವ ಮಾರ್ಗವನ್ನು ಹುಡುಕಿದೆ.

लेखक
Research Matters
ಮೈಕ್ರೋಸಾಫ್ಟ್ ಡಿಸೈನರ್ ನ ಇಮೇಜ್ ಕ್ರಿಯೇಟರ್ ಬಳಸಿ ಚಿತ್ರ ರಚಿಸಲಾಗಿದೆ

ಐಐಟಿ ಬಾಂಬೆಯ ಸಂಶೋಧಕರು ಶಾಕ್‌ವೇವ್-ಆಧಾರಿತ ಸೂಜಿ-ಮುಕ್ತ ಸಿರಿಂಜ್ ಅನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಮೂಲಕ ಸೂಜಿಗಳಿಲ್ಲದೆ ಔಷಧಿಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವ ಮಾರ್ಗವನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ.

लेखक
Research Matters
ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ವಸ್ತುವಿನ ಅಧ್ಯಯನ

ಹಯಾಬುಸಾ ಎಂದರೆ ವೇಗವಾಗಿ ಚಲಿಸುವ ಜಪಾನೀ ಬೈಕ್ ನೆನಪಿಗೆ ತಕ್ಷಣ ಬರುವುದು ಅಲ್ಲವೇ? ಆದರೆ ಜಪಾನಿನ ಬಾಹ್ಯಾಕಾಶ ಸಂಸ್ಥೆ - (ಜಾಕ್ಸ, JAXA) ತನ್ನ ಒಂದು ನೌಕೆಯ ಹೆಸರು ಹಯಾಬುಸಾ 2 ಎಂದು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ನೌಕೆಯನ್ನು ಜಪಾನಿನ ಬಾಹ್ಯಾಕಾಶ ಸಂಸ್ಥೆ ಸೌರವ್ಯೂಹದಾದ್ಯಂತ ಸಂಚರಿಸಿ ರುಯ್ಗು (Ryugu) ಕ್ಷುದ್ರಗ್ರಹವನ್ನು ಸಂಪರ್ಕ ಸಾಧಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ  ಡಿಸೆಂಬರ್ 2014 ರಲ್ಲಿ ಉಡಾವಣೆ ಮಾಡಿತ್ತು. ಇದು ಸುಮಾರು ಮೂವತ್ತು ಕೋಟಿ (300 ಮಿಲಿಯನ್) ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಪ್ರಯಾಣಿಸಿ 2018 ರಲ್ಲಿ ರುಯ್ಗು ಕ್ಷುದ್ರಗ್ರಹವನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಿತ್ತು. ಅಲ್ಲಿಯೇ ಕೆಲ ತಿಂಗಳು ಇದ್ದು ಮಾಹಿತಿ ಮತ್ತು ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿ, 2020 ಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಹಿಂತಿರುಗಿತ್ತು.

लेखक
Research Matters
ಕಾಂಕ್ರೀಟ್‌ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಪ್ರೋಬ್‌

ಕಾಂಕ್ರೀಟ್‌ನಲ್ಲಿ ಹುದುಗಿರುವ ರೆಬಾರ್‌ಗಳಲ್ಲಿನ ತುಕ್ಕು ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಮಾಪಿಸಲು ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಒಂದು ಹೊಸ ತಪಾಸಕವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದ್ದಾರೆ.

लेखक
Research Matters
‘ದ್ವಿಪಾತ್ರ’ದಲ್ಲಿ ಮೈಕ್ರೋ ಆರ್‌ಎನ್‌ಎ

ವೈರಲ್ ಸೋಂಕುಗಳು ಮತ್ತು ಸ್ವಯಂ ನಿರೋಧಕ ಕಾಯಿಲೆಗಳಲ್ಲಿ ಮೈಕ್ರೋ ಆರ್‌ಎನ್‌ಎ ‘ದ್ವಿಪಾತ್ರ’ದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ. 

लेखक
Research Matters
ರೀಚಾರ್ಜ್ ಮಾಡಬಹುದಾದ ಬ್ಯಾಟರಿಗಳು

ಐಐಟಿ ಬಾಂಬೆ ಯ ಬ್ಯಾಟರಿ ಪ್ರೋಟೋಟೈಪಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ನ ಸಂಶೋಧಕರು ಇಂಧನ (ಶಕ್ತಿ) ಶೇಖರಣಾ ಸಾಧನವಾಗಿರುವ ರೀಚಾರ್ಜ್ ಮಾಡಬಹುದಾದ ಬ್ಯಾಟರಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. 

Loading content ...
Loading content ...
Loading content ...
Loading content ...
Loading content ...